हडको परिसरात भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन, सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी ऊपसथीती -NNL


नविन नांदेड।
भाजयुमो शहर  महानगर जिल्हाध्यक्ष युवा शक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने दहिहंडी महोत्सव चे आयोजन ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

प्रथमच सिडको हडको परिसरात या भव्य दहिहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या  दहिहंडी महोत्सवात नांदेड शहरातील व जिल्ह्यातील नामवंत दहिहंडी मंडळ सहभागी होणार असून प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे, या कार्यक्रमास मराठी सिनेमा अभिनेत्री प्राजक्ता माळी व नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 हा सोहळा हडको परिसरातील एम.एच.२६ हाटेल  चा समोरील भागात व गोविंद गार्डन चा पाठीमागील भागात म होणार असुन या भव्यदिव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे, सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील नागरिक व महिला , युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व युवा शक्ती मित्र मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी