नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणारे कार्यक्रम आणि नियोजन याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
सदर मुलाखतीमधून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर जिल्हा परिषदेमध्ये राबवण्यात आलेले उपक्रम तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाची पूर्वतयारी, नियोजन व विविध उपक्रम या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुलाखतीतून माहिती दिली आहे. तरी सर्व श्रेत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.