नांदेड| घरोघरी तिरंगा मोहिमेच्या प्रसारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने फिरत्या वाहनाद्वारे नांदेड महानगरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली असून या वाहनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनाद्वारे दृकश्राव्य माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत घरोघरी तिरंगाबाबत अचूक संदेश पोहचण्यास मदत होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, विकास माने, तहसीलदार किरण अंबेकर,नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, काशीनाथ डांगे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे भूमि अभिलेख विभागाकडून घरोघरी तिरंगाचा जागर
नांदेडजिल्ह्यातील किनवट भूमिअभिलेख विभाग नांदेड व उपअधिक्षक भूमिअभिलेख किनवट यांनी आदिवासी किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे घरोघरी तिरंगा अभियानाबाबत गावकऱ्यांशी सुसंवाद साधून जनजागृती केली. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी पुढाकार घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही अनोखी कृतज्ञता व्यक्त केली. भिमपूर गावातील महिलांना त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगाची भेट दिली.