उस्माननगर, माणिक भिसे। केंद्रशासन व राज्यशासन यांच्या वतीने संपूर्ण देशात भारताचा आजादी का अमृत महोत्सव दि.१३ ऑगस्ट पासून उस्माननगर येथील शासकीय ,व निमशासकीय कार्यालये तसेच हर घर तिरंगा उपक्रमास सर्वस्थरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने उत्साहात साजरा करण्यास प्रारंभ केला आहे.
केंद सरकार व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात भारताचा ७५ वा आजादी का आमृत महोत्सव आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर , यांच्या सुचनेनुसार प्रत्येक तालुका, गावागावांतील सर्वस्थरातील विभागातील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना दि . १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याचा आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी समूहगान , प्रभातफेरी काढून नागरिकांना तिरंगा रॅलीव्दारे संदेश देण्यात आले.
येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा ,सम्राट अशोक प्राथमिक शाळा, त्रिमूर्ती मा.विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी , विद्यार्थी , सहशिक्षक मुख्याध्यापक , यांनी गावातील प्रमुख रस्त्याने तिरंगा रैली काढण्यात आली.व शाळेत राष्ट्रभक्तीचे गिते ऐकवली त्यामुळे विद्यार्थ्यांना देशभक्ती निर्माण व्हावी.व ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांचे स्मरण , आठवण सतत राहावे म्हणून समुहाने गीत गायले , जिल्हा परिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थी यांना झेड्याचे वाटप केले. सकाळी प्रत्येक घरावर तिरंगी झेंडा फडकावून स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष हार्षाउल्हासाने उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रत्येकाच्या मनात राष्ट्राबध्दल कृतज्ञतेने नतमस्तक होऊन ध्वजवंदना केली. गगनात तिरंगा लहरता पाहून अनेकांना वीर जवानाची आठवण झाली.उस्माननगर येथील प्रत्येक कार्यलय व गावातील फडकत असलेले तिरंगी झेंडा हर्षाने लहरत होता. दि.१३ ते १५ पर्यत हर घर तिरंगा उपक्रम असल्याने परिसर तिरंगामय झाले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशबांधव मध्ये नवचैतन्याची लाट उसळली आहे.