या मध्ये उपविभागीय अधिकारी तहसिलदार न.पा.चे प्रभारी मुख्याधिकारी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक तालुक्यातील विविध पोलिस स्टेशनचे सह्याक पोलिस निरक्षक तथा विविध प्रशासकीय कार्यालय शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या शाळेचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता हदगाव तहसिल कार्यालयीन आधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी व महीला बचत गट सामाजिक महीला कार्यकर्ते च्या संकल्पनेतुन ३७५ फुट लांबीचा तिरंगा ध्वज हा रँलीचे विशेष आकर्षण होते हे आवर्जून उल्लेख करावा लागेल...!
नियोजनाचा अभाव दिसला....
या अमृतमहोत्वनिमित्तान प्रशासकीय विभागाद्वरे विविध उपक्रम राबविण्यात येत आसल्याचे दिसुन येते तसेच शुक्रवारी शहरातील विविध शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थ्यांची रँली काढण्यात आली तेव्हा या रँलीमध्ये शालेय विद्यार्थी यांना शहरातील नाल्यावरिल घाण रोडवर येत आसल्याने त्याचा ञास जाणवत होता. तसेच शहरातील खड्डे तरी न.पा. प्रशासनाने रँलीच्या दिवशी रोडवरचे खड्डे बुजवयाला हवे होते तसेच रोडच्या बाजुला असलेल्या नालीच्या औषध फवारानी किवा जंतुनाशक पावडर तरी मारायला हवे होते. दुसरी गंभीर बाब म्हणजे प्रशासनाने शहरात जर सामाजिक सस्थाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करिता अहवान केले असते तर अनेक सामाजिक संघटनानी त्यांना प्रतिसाद दिला असता. बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या पाणी पाऊचा वापर केल्याचे दिसुन आले.