मतदारांनी मतदार यादीशी - आधार जोडणी करावी - सा.जिल्हाधिकारी सौम्या शर्मा -NNL

मुखेड ९१ विधानसभा निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली माहिती

मुखेड, रणजित जामखेडकर| ९१ - मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आपल्या मतदार यादीतील नावाशी आधार कार्डाची जोडणी करुन घ्यावी . या नोंदणी साठी पुढाकार घेवुन National Voters Service Portal ( NVSP.in ) या संकेतस्थळाला भेट दयावी किंवा voter helpline app download करुन त्याव्दारे मतदार यादीतील तपशिलाशी आधार जोडणी करावी तसेच मतदार यादीच्या नोंदणी आधार क्रमांकाची जोडणी करण्यासाठी आपल्या घरी येणा - या बी.एल.ओ ( मतदान केंद्रस्तरीय अधिकरी ) यांना सर्व मतदारानी सहकार्य करावे असे आवाहन ९१- मुखेड मतदार नोंदणी अधिकारी तथा देगलुर येथील उपविभागीय सहा.जिल्हाधिकारी सौ.सौम्या शर्मा यांनी केले आहे.

सर्व मान्यताप्राप्त पक्षाचे तालुका अध्यक्ष / सचिव , प्रतिनीधी यांच्या समवेत तहसिलदार , मुखेड यांच्या अध्यक्षतेखाली आज दि .०५. ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत तालुक्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनीधी उपस्थित होते . निवडणूक कायदा अधिनीयम २०२१ अन्वेय लोकप्रतिनिधित्व अधिनीयम १९५० मध्ये सुधारणा केले आहेत त्यानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडणे आणि प्रमाणीकरणासाठी मतदाराकडुन ऐच्छिकपणे आधाराची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भुत आहेत.

आधार क्रमांक मिळवण्याच्या उद्देश मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणुक सेवा प्रदान करणे असल्याचे सहा.जिल्हाधिकारी , देगलुर सौम्या शर्मा यांनी या वेळी सांगीतले . १८ वर्ष पुर्ण झालेल्या नव मतदाराचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी १ जानेवारीला १८ वर्ष पुर्ण होणा - या नागरीकास नाव नोंदविता येत होते . परंतु आता निवडणुक आयोगाने चार सुधारणा केली आहे . या सुधारणानुसार दिनांक १ जानेवारी अर्हता दिनांकावर आधारीत पुनरिक्षण कार्यक्रामा व्यतिरिक्त त्याच वर्षातील १ एप्रिल , १ जुलै , १ ऑक्टोबर या दिनांकावर पात्र होणा - या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदार यादीतील यापुर्वीच नाव नोंदविलेल्या मतदारांसाठी त्यांच्या नावाला आधार क्रमांक जोडण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात दिली. यावेळी तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रमुख राजकीय पक्षांची पदाधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी