जुलै 2022 मध्ये ऑनलाईन फसवणूक झालेले रुपये 7,04,611, संबंधिताच्या खात्यात परत जमा
नांदेड। जुलै 2022 मध्ये नांदेड जिल्ह्यात एमएसईबी बिल भरणे बाबत खोटे मेसेज पाठवून- लिंक पाठवून, कुरियरने मागवलेले पार्सल न आल्याने कंपनीचा ऑनलाईन कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करून त्यावर चौकशी केल्याने व तो मोबाईल क्रमांक फ्राॅड असल्याने फसवणूक झाली होती.
फसवणूक झालेल्या चार व्यक्तींकडून फसवणुकीच्या घटनेची सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरीक्षक थोरवे, दळवी पोलीस नाईक राठोड ,शेवाळे ,स्वामी यांनी सविस्तर माहिती घेऊन तात्काळ बँक/ यूपीआय/ वॉलेट/ मर्चंट यांना मेल करून पाठपुरावा केल्याने रक्कम प्रथम होल्ड /फ्रिज करून नंतर संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा झाली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रमोद कुमार शेवाळे, मा.अप्पर पोलीस अधीक्षक ,मा.श्री विजय कबाडेमा. श्री निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर टीमला रुपये 8,64,611 पैकी 7,04,611 परत मिळवण्यात यश आले असून या कामगिरी बाबत मा.पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.
सर्व नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 ---- वर संपर्क करावा तसेच संबंधित पोलीस ठाणे व सायबर पोलीस स्टेशन येथे फसवणुकी बाबत माहिती द्यावी ,असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रमोद कुमार शेवाळे यांनी केले आहे.