नांदेड| मराठी साहित्यातील प्रतिभावंत कथालेखक जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा १०जुलैला आरंभ झाला आहे.या औचित्याने यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,जिल्हा केंद्र नांदेड आणि 'कथायन'च्या वतीने जी.ए.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
जी.ए. म्हणजेच गुरुनाथ आबाजी कुलकर्णी.त्यांनी अनुवाद केले,चित्रे काढली.त्यांच्या कथांनी मराठी साहित्य समृद्ध केले असून त्यांचा स्वतंत्र वाचक वर्ग आहे.अशा थोर कथाकाराला अभिवादन करण्यासाठी कथांचे अभिवाचन डॉ. वृषाली किन्हाळकर, डॉ. योगिनी सातारकर पांडे आणि शिवाजी आंबुलगेकर हे करणार आहेत.
तसेच याच कार्यक्रमात जी.एं.च्याच 'चैत्र'या कथेवरून दिग्दर्शक क्रांती रानडे यांनी साकारलेला लघुपटही दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार,दि.७ - ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०७-०० वाजता संजीवन हॉस्पिटल,डॉ. किन्हाळकर यांचे निवास,पूर्णा रोड ,नांदेड येथे पार पडणार आहे. रसिक ,वाचकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे; असे आवाहन 'कथायन'चे मधुकर धर्मापुरीकर आणि यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या नांदेड जिल्हा केंद्राच्या वतीने शिवाजी गावंडे यांनी केले आहे.