नांदेड| भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘नांदेड के हर घर तिरंगा ’ या उपक्रमासाठी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,संजय अग्रवाल व सचिन शिवलाड यांनी नांदेडच्या पोस्ट ऑफिस मधून २०२२ तिरंगे ध्वज विकत घेतल्याबद्दल डाकघर अधीक्षक राजीव पाळेकर यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
या अभियानासाठी प्रत्येकी शंभर झेंडे देणाऱ्या देणगीदारामध्ये डी. एच. अग्रवाल, विलास पाटील टाकळीकर ,संजय अग्रवाल,धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,सिद्राम दाडगे , सुमित राठोड, संध्या राठोड, सचिन शिवलाड, डॉ.शितल भालके,विजय कुलकर्णी बोराळकर ,सागर शिंदे, डॉ. उज्ज्वला सदावर्ते, प्रा.डाॅ. एस एस जाधव ,रमाकांत भंडारे, उमा कुलकर्णी ,तौसीफ अहमद , भूषण वसंत सुवर्णकार यांचा समावेश आहे. स्नेहलता जयस्वाल, संध्या धोंडोपंत पोपशेटवार, सुषमा ठाकूर , संंतराम गीते, सतनाम कौर हुडा,वसंत अहिरे ,रवी जयस्वाल , विकास काबरा, कार्तिक मालिवार , डॉ. वीरेंद्र अवधिया यांनी प्रत्येकी पन्नास झेंडे दिले आहेत. तेहतीस तिरंगे झेंडे देणाऱ्या मध्ये शिवा शिंदे,डॉ. अमोल हिंगमिरे, सदाशिव महाजन यांचा समावेश आहे.
पोस्टकडून शासकीय दरानुसार प्रती झेंडे पंचवीस रुपये दर आकारण्यात आला. याप्रसंगी डाकघर उपअधीक्षक डी.आर. शिवनीकर व एस.आर. मामीडवार, सहाय्यक पोस्ट मास्तर विनोद शेट्टी, गणेश धंपलवार,राहुल रणवीरकर हे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत पंचवीस रुपयाचा तिरंगा झेंडा , दहा रुपयाची काठी व एक रुपयाची दोरी एकत्रित किंमत छत्तीस रुपये होत असून सवलतीच्या दरात दानशूर नागरिकांनी शंभर झेंड्यांसाठी तीन हजार रुपयाची मदत करायची आहे. आर्थिक मदत करणाऱ्यांच्या नावाचे स्टिकर झेंड्याच्या दांड्यावर चिटकवण्यात येणार आहे. तसेच देणगीदारांची यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून दररोज तीस हजार लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे,सचिव डॉ. अमोल हिंगमिरे, कोषाध्यक्ष सदाशिव महाजन,लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा,सचिव बिरबल यादव,कोषाध्यक्ष सविता काबरा यांनी केले आहे.