उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे किवळा ता.लोहा येथील श्री सद्गुरू बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज यांच्या आश्रमात १०१ वृक्षाची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मोहनराव पाटील घोगरे, दत्ता मारुती पोतगंते सेवानिवृत्त कॅप्टन मराठा बटालियन भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांचा यावेळी श्री सद्गुरू बाळ ब्रम्हाचारी वैरागी महाराज आश्रम यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी श्री मारुती हरिभाऊ मोरे देशमुख यशवंत कोचिंग क्लासेस सिडको चे संस्थापक यांच्या वाढदिवसही साजरा करण्यात आला. याप्रसंगी आश्रमाचे पुजारी श्री दादाराव पाटील टर्के यांचे आशीर्वाद लाभले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृक्षमित्र शिवाजी पाटील टर्के , गायकवाड नवनाथ, संतोष मोरे(देशमुख) किवळेकर श्री पांडुरंग शिरसाट उमरेकर सर ,सौ. उमाटे मॅडम पालक वर्ग विद्यार्थी वर्ग यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर वनभोजनाचा कार्यक्रम झाला याप्रसंगी 101 वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी सदभक्त मंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.