देशसेवा करुन मायभूमित परतलेल्या सैनिकाचा कृतज्ञता सोहळा साजरा व्हावा - साहेबराव मामिलवाड -NNL

गोदावरी अर्बन सिडको शाखेच्या वतीने सुभेदार दत्ता पोतगंते यांचा सन्मान


नांदेड।
देशातील प्रत्येक नागरीकांना आपल्या हातुन देश सेवा घडावी असे वाटत असते. परंतू देशाच्या सिमेवर जाऊन देश सेवा करण्याची सर्वांना संधी मिळत नाही. ज्यांना ही संधी मिळते ते खऱ्या अर्थाने देशाचे हिरो असतात. तेव्हा देशाची सेवा करुन मायभूमित परतलेल्या बहाद्दर सैनिकांच्या कार्याप्रती त्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गोदावरी अर्बन संस्थेच्या सिडको शाखेच्या वतीने सुभेदार दत्ता पोतगंते यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यप्रती आदर व्यक्त करण्याचे कार्य केले आहे. असे वक्तव्य सिडको शाखेचे पालक संचालक साहेबराव मामीलवाड यांनी येथे केले.

गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या पाच राज्यात विस्ताररलेल्या ९१ शाखांमध्ये गोदावरी परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातुन निरंतर समाजसेवेचे कार्य केले जाते.   नुकतेच किवळा येथील रहिवासी १६ व्या मराठा बटालियनचे सुभेदार ऑननरी लेफ्टनंट दत्ता मारोतराव पोतगंते हे २८ वर्ष देशसेवा करून सेवा निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त होऊन पहिल्यांदाच ते मायभूमित परतले आहेत. 

त्यांच्या देशभक्ती प्रती आदरयुक्त सन्मान करण्याच्या उद्देशाने गोदावरी अर्बन सिडको शाखेच्या वतीने सुभेदार दत्ता पोतगंते यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानन करण्यात आला. गोदावरी परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानास उत्तर देताना सुभेदार दत्ता पातगंते म्हणाले की, गोदावरी परिवाराकडुन झालेला हा सत्करा सोहळा कायम स्मरणात राहिल. पाच राज्यात परसलेल्या गोदावरी परिवाराच्या हातुन विविध सामाजिक कार्यातुन देशसेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हि अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.

भविष्यात गोदावरी परिवार केवळ पाच राज्यापूर्ता मर्यादित न राहता देशातील सर्वच राज्यात शाखांचा विस्तार व्हावा आणि देशसेवा करुन मायभूमित परतलेल्या प्रत्येक सैनिकांचा गोदावीर परिवाराकडुन सन्मान व्हावा अशी सुभेदार दत्ता पातगंते यांनी आपली भावना व्यक्त केली. शाखेत घेण्यात आलेल्या छोटेखाणी कार्यक्रमानंत सुभेदार दत्ता पातगंते यांना संस्थेतील विविध सेवा विषयी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी शाखा व्यवस्थापक पंकज इंदूरकर, अधिकारी सोमेश संगेवार, उमाकांत जंगले, गजानन पाटील, सुविधा भगत, दत्तात्रय पोचमपल्ली, यशोद पवार, गजानन मोरे , शुभम भुरे व दैनिक ठेव प्रतिनिधी हनुमंत कदम, साईनाथ बोचरे, संदीप जिलेवाड, गोविंद कोंके, वैभव दोमटवार, सुभाष तुपतेवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी