शहरातील सर्व शाळेच्या 1 हजार 500 विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या मैदानात आज दि.०९ ऑगस्ट रोजी तब्बल १ हजार ५०० शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून क्रांतीदिनी 'पर्यावरण' आणि 'घरोघरी तिरंगा' अभियानाची जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आवाहनानुसार हिमायतनगर शिक्षण विभागाच्या वतीने 'हर घर तिरंगा' ही चळवळीला गती देण्यासाठी आणि लोकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोहीम व्यापक करण्यासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून मानवी साखळीद्वारे एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा हा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमाला हिमायतनगर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला असून, यावेळी प्रत्येकानी आपापल्या घरावर येत्या १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकावून हर घर तिरंगा उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, विषय तज्ज्ञ, शहरातील सर्व शाळांचे ५० ते ६० शिक्षक, १५०० विद्यार्थी यांनी उपस्थिती लावली होती. तसेच प्रत्येक्ष शिक्षकांनी ३ ध्वज डोनेट केले असून, आपापल्या शाळा परिसरातील नागरिकांना हे ध्वज वितरण करणार आहेत.