नांदेड| झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेच्यावतीने नांदेड भूषण डॉ.हंसराज वैद्य यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. झील कांता इंटरशॅनशल सोशल फाउंडेशन संस्था पुणे व चला कवितेच्या बनात साहित्यीक संस्था उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे नुकतेच एक निमंत्रीत कविंचे संमेलन घेण्यात आले. हे संमेलन फक्त आई या विषयावरील कवितांचे घेण्यात आले.
निमंत्रितांच्या कवि संमेलनात प्रा.बालाजी सूर्यवंशी, प्रा.नामदेव गरड, डॉ.क्रांती मोरे, प्रा.नयन राजमाने, बालाजी बिरादार, प्रा.सतिश हानेगावे, प्रा.राजपाल पाटील, सौ.शैलजा कारंडे, सौ.शिला पाटील, सौ.मिनाक्षी पाटील. इ. कवि-कवयीत्रींनी भाग घेतला. या कवी संमेलनास उदगीर व उदगीर परिसरातील रसिक साहित्यीक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे संमेलन संत ज्ञानेश्वर माऊली शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखीका तथा कवयत्री सौ.शांताबाई गिरबने, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवि तथार गजलकार प्रा.अरविंद्र सगर, डॉ.हंसराज वैद्य होते. या संमेलनात राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार नांदेड भूषण डॉ.हंसराज वैद्य यांना संस्थेच्या अध्यक्षा तथा जी.एस.जी.च्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ.प्रमिला तलवाडकर व अनंत चंपाई, माधव कदम यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात विवेक सौताडेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण सेवा पुरस्कार, उमाकांत मिटकर यांना राज्यसतरीय साहित्य साधना पुरस्कार तर सतिश पाटील यांना राज्यस्तरीय युवारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा ह्दयस्पशी कार्यक्रम जवळ जवळ साडे तीन ते चार तास चालला.