नांदेड| २८ जुलैपासून सीटू संलग्न संघटित कामगार संघटनेचे बेमुदत्त धरणे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. मौजे काकांडी तर्फे तुप्पा येथील सिंचन विहिरीचे थकीत बिल व ग्रामसेवक, अभियंता व गटविकास अधिकारी पं.स.नांदेड यांच्यावर कारवाई करून शेतकरी देविदास देशमुख यांचे बिल अदा करावे तसेच नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर नांदेड या शाळेची मूळ संचिका तपासून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी.
खोटी विद्यार्थी पट संख्या दाखविणाऱ्या मुख्याध्यपकावर कारवाई करावी. विना बांधकाम परवानगी असलेली व जीर्ण झालेली शाळेची इमारत सील करावी. गांधीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेमध्ये संचालकाच्या मुलीने अवैध बंगला बांधला आहे ते अतिक्रमण काढून टाकावे. उपरोक्त शाळेतील पिढीत सहशिक्षक आशा माधवराव गायकवाड व केशव रामजी धोंगडे या शिक्षकांना संस्थेने तीस वर्षे अध्यापनाचे कार्य करून घेतले आहे. परंतु त्यांचा अप्रोल न काढता इतर लोकांचा अप्रोल काढला आहे.त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला किमान वेतन कायद्यानुसार देण्यात यावा.
आदी मागण्यांसाठी मागील बारा दिवसांपासून सीटूचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. गोपीनाथ देशमुख यांनी दि.२८ जुलै पासून सात दिवस उपोषण देखील केले आहे. तीन ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने देखील करण्यात आली आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी आंदोलनाची अध्याप दखल घेतलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीटूच्या वतीने दि.८ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले असून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील पाठपुरावा करणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्या निवेदनाच्या प्रति जिलाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्यात आल्या असून तशी पोच पावती देखील सीटूने प्राप्त करून घेतली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उमेद अभिनातील रोशनी,साईबाबा व खुशी महिला स्वयंसहायता समूह तिरंगा ध्वज जिल्हा परिषदेच्या गेटपुढे विक्री करीत आहेत. आज त्यांचे ध्वज आंदोलकानी खरेदी केले व विक्री करण्यासाठी मदत केली आहे. या धरणे आंदोलनांमध्ये सीटूचे जनरल सेक्रेटरीकॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे,कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.दिलीप कंधारे,कॉ.नागनाथ पवार, कॉ.सचिन सरोदे, कॉ.केशव सरोदे, कॉ.निखिल सावळे,कॉ.गोपीनाथ देशमुख आदींची उपस्थिती आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा सीटूच्या वतीने यापूर्वीच प्रशासनास देण्यात आला आहे.