मतदार संघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा द्यावी - आ. डॉ. राठोड -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
मतदारसंघातील रुग्णांना योग्य पद्धतीने रुग्णसेवा न मिळाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या व त्यांचे निलंबन केले जाईल असा इशारा मुखेडचे लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांनी दिला. 

रुग्णालयाच्या कामकाजाविषयी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांच्याशी मुखेड रुग्णालयाच्या कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करून कर्तव्यात वारंवार कसूर करणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश दिले . थोड्याच दिवसात इतर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होईल अशी माहिती आ . राठोड यांनी दिली. 

उपजिल्हा रुग्णालयामध्ये मागील अनेक दिवसापासून रुग्णांना व्यवस्थित रुग्णसेवा मिळत नाही. डॉक्टर कर्तव्यावर राहत नाहीत. अशा अनेक तक्रारी प्रसारमाध्यमातून व समाज माध्यमातून जनतेसमोर येत होत्या. या अनुषंगाने आ. डॉ.तुषार राठोड यांनी दहा दिवसापूर्वी उप जिल्हा रुग्णालय मुखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर तहाडे व येथील सर्व वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली होती. समाज माध्यमात व प्रसारमाध्यमातून येणाऱ्या नकारात्मक बातम्या बंद झाल्या पाहिजेत. 

उप जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे . मुखेड शहर व परिसरातील रुग्णांना चांगली रुग्णसेवा या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे . दवाखान्यात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक प्रत्येक महिन्याला एक तारखेपूर्वी वैद्यकीय अधीक्षक तयार करतील व ते वेळापत्रक रुग्णालयामध्ये सर्वाच्या माहितीसाठी दर्शनीय ठिकाणी लावावे अशा सूचनाही लोकप्रिय आ.डॉ.राठोड यांनी दिल्या .

मुखेड उपजिल्हा रुग्णालयात गैरहजर राहुन नागरिकांची हेळसांड करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही.कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरावर निलंबनाची कार्यवाही करणार - आ. डॉ.तुषार राठोड

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी