उस्माननगर, माणिक भिसे| समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथील शाळेंत भारतीय सातंत्र्याचा ७६ वा आजादी का अमृतमहोत्सवी वर्ष भव्य प्रभातफेरीत ७५ स्वातंत्र्य सैनिक, विर हुतात्म्यांच्या व क्रांतीकार देशभक्तांच्या फलकावरील चित्रे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांच्या हातातील तिरंगा , प्रभातफेरीत ट्रॅक्टर वरील आकर्षक वेशभुषाने घोषणांनी यंदाचा स्वातंत्र्यदिन आगळावेगळा उपक्रमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी शाळेच्या भव्य प्रांगणात संस्थेचे उपाध्यक्ष कमलाकराव देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी समता शिक्षण प्रसारक मंडळ मोठि लाठ चे आध्यक्ष - पुरुषोत्तमराव देशपांडे, कोषाध्यक्ष- अनिरुद्ध सिरसाळकर माजी विद्यालया चे माजी मुख्याधापक तथा संस्थेचे संचालक - शांमसुंदरराव जहागीरदार संचालक - प्रदीप देशमुख मुख्याध्यापक - गोविंद बोदेमवाड पर्यवेक्षक तथा कलाध्यापक - राजीव अंबेकर , कॅप्टन किशनराव कपाळे , पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, पत्रकार माणिक भिसे, सुर्यकांत मालीपाटील, गणेश लोखंडे, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी नागरिक व मोठी विद्यार्थी संख्या उपस्थित होते.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतीनिष्ठ शेतकरी,राजकीय नेते कार्यकर्ते,पत्रकार, व्यापारी, पंचकऋतील पालक विविध कार्यालयातील आधिकारी कर्मचारी,माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या दहावी व बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालया च्या वतीने गौरव करण्यात आला. गावातील प्रतिष्ठित नागरीकांच्या वतीने रोख पारितोषिके देवुन गौरव हि करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्या प्रभात फेरीचे आयोन करण्यात आले होते.
सर्व शिक्षक /शिक्षिकां यांच्या परीश्रमातुन दोन ट्रॅक्टरवर देशभक्तांच्या वेशभूषा परीधान केलेल्या आकर्षक झाक्याने सर्व नागरीकांच्ये लक्ष वेधून घेतले होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा कलाध्यापक यांच्या संकल्पनेतून या प्रभातफेरीत नव्यानेच ७५ स्वातंत्र सैनिक, विर हुतात्म्यांचे, क्रांतीकार, देशभक्तांतां चित्रे व तिरंगा विद्यार्थी हातात घेवुन त्यांचा जय घोष करताना परिसरात एक नव चैतन्य भरले, संपुर्ण उस्माननगर नगरी देशभक्तीने व वरूण राज्या च्या अगमनाने नाहुन निघाली. एकीकडे देशभक्तांचे छायाचित्रे दुसरी कडे तिरंगे फडकत होते. हे विहंगम दृष्य शेकडो नागरिकांच्या मोबाईल मध्ये टीपले जात होते. दिड तास चाललेल्या रॅली चा समारोप समता विद्यालया च्या प्रांगणात सर्वां चे मार्गदर्शक शांमसुंदरराव जहागीरदार गुरूजी अमृत वाचनाने झाला.
मुख्याध्यापक बोदेमवाड यांच्या वतीने उपस्थितांना फराळाची उत्तम सोय केली होती.सर्वांचे तोंड ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोतीचुर लडू देवून सर्वांना वटप करण्यात आले. या रॅलीचे सुत्रबध्द नियोजन क्रीडा शिक्षक पी. बी .इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी यांनी पार पाडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कलाध्यापक तथा पर्यवेक्षक राजीव अंबेकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांनी मानले.या प्रभातफेरीचे आकर्षक असलेल्या थोर महापुरुषांच्या वेशभूषातील म.गांधी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, सावरकर, भारतमाता,अदी महापुरुषांच्या वेशभूषातील विद्यार्थ्यांच्या कडे पाहण्यासाठी नागरिकांनी घराघरांतून पाहून अनेकांनी कौतुक केले.व पाहाण्यासाठी गर्दी केली होती.