नविन नांदेड। सिडको परिसरातील संभाजी चौक भागातील श्रीकृष्ण मंदिर देवस्थान येथे १८ व १९ आगसष्ट दोन दिवसीय जन्म उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता तर सिडको हडको परिसरातील अनेक भागात बाल गोपाळ व युवकांनी दहीहंडी उत्सवाच्ये आयोजन केले होते.
देवस्थान समितीच्या वतीने सोमवार दि. १८ रोजी धुप आरती श्रीकृष्ण मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर सायंकाळी भजनी दिंडी यांच्या भजनांचा कार्यक्रम तर कलशारोहण वर्धापनदिन निमित्ताने विविध कार्यक्रम चे आयोजन तर मंगळवार दि. १९आगसष्ट हभप प्राचार्य सु.ग. चव्हाण नायगाव यांच्ये काल्याचे किर्तन झाले,व नंतर गोपालकाला व दहिहंडी, आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला, कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण युवक मंडळ, श्रीकृष्णनगर, संभाजी चौक, सिडको, नांदेड परिश्रम घेतले.
सिडको हडको परिसरातील विविध भागात युवकांनी व बाळ गोपाळांनी दहीहंडी उत्सवाच्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी ढोलताशांच्या गजरात व विविध गाण्यावर युवकांनी जल्लोष मध्ये दहीहंडी फोडली या वेळी परिसरातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे ही दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते यावेळी युवानेते ऊदयभाऊ देशमुख सेवकरी नवनाथ कांबळे, व भाविक भक्तांची ऊपसिथीत दहीहंडी फोडण्यात आली.