उस्माननगर, माणिक भिसे| श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव व गोपाळकाल्याच्या निमित्ताने जि.प कन्या शाळा उस्मानगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथे सहशिक्षिक अनिरूद्ध सिरसाळकर व इतर शिक्षिका यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी सकाळी दहीहंडीचा छोटेखानी सुरेख असा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडून उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
हा सोहळा पाहण्यासाठी शाळेत पालकांनी गर्दी केली होती. इयत्ता पहिलीतील विद्यार्थीनी आराध्या शिवाजी घोरबांड हिरे कृष्णाची भूमिका वेशभूषा अतिशय सुरेख पार पाडली, इयत्ता सहावीतील व सातवीतील मुलींनी राधा व गवळणीच्या भूमिका पार पाडल्या, अतिशय उत्साहात दहीहंडी सोहळा पार पडला, चिमुकल्यांनी हात्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या घोषणांनी मुलांनी जयघोष करून दहीहंडीचा काला खाऊन आनंद उत्सव साजरा केला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातवीचे वर्गशिक्षक अनिरुद्ध सिरसाळकर, सौ मंजुषा देशमुख सिरसाळकर व सौ गाजूलवाड मॅडम, पांडागळे सर आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्या बद्दल, मुख्याध्यापकांनी सर्व सहभागी राधा,गवणळीचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले.
जि.प.कन्या शाळेत सलग तीन दिवस भारतीय स्वातंत्र्याचा आजादी का अमृतमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरा केला.विद्यार्थ्याना तिरंगा झेड्याचे वाटप करण्यात आले होते.विधायक उपक्रमातून विद्यार्थ्यांनीना हिम्मत यावी म्हणून असे उपक्रम शाळेत सिरसाळकर घेत असल्याने पालकवर्गात समाधान व्यक्त होत आहे.