जेष्ठ नागरिक असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास हिमायतनगर एसबीआयची टाळाटाळ -NNL

जेष्ठ शेतकरी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार  


हिमायतनगर|
सततची नापिकी व अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केकडून जेष्ठ शेतकरी असलेल्या नागरिकांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या टेभी येथील 
रायेवार नामक शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री, कृषिमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडं लेखी तक्रार देऊन पीककर्ज देण्याचं आदेशित करावं असंही म्हंटल आहे.

कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली. शेतमाल, भाजीपाला कवढीमोल दराने विक्री करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परस्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून आधार देणे आवश्यक आहे. त्यामुळे बैंकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप करावं. आणि पीक कर्जासाठी शेतकऱ्याची अडवणूक करू नये मात्र अश्या सर्व नियमांना बगल देऊन हिमायतनगर शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिक शेतकरी बांधवाना खरीप हंगामात कृषी लोन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

परिणामी अनेक जेष्ठ नागरिक शेतकरी कृषी कर्जापासून वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे सर्व वंचित शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन टेभी येथील शेतकरी राजेश्वर नारायण रायेवार यांनी भारतीय स्टेट बैंक अधिकाऱ्याच्या विरोधात कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर तालुक्यात कृषी कर्जाचा प्रश्न उपस्थित झाला असून, यामुळे अनेक शेतकरी खाजगी सावकारी पाशात अडकत असल्याचे दिसते आहे.  या संदर्भात हिमायतनगर येथील बैंकेच्या शाखाधिकारी यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.   

त्यांनी याबाबत तक्रारदार रायेवार पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, माझ्याकडे ३.५ एकर शेती आहे, ज्यात ऊस, सोयाबीन, हळद आदी पिके घेतली जातात. दुष्काळी परिस्थितीमुळे मलाही शेतीसाठी पीककर्जाची गरज आहे. मात्र हिमायतनगर येथील बैंक अधिकारी जेष्ठ नागरिक असल्याने कर्ज देता येत नाही असे कारण दाखऊन टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मी एसबीआयचे विभागीय अधिकारी श्री येरावार यांची भेट घेतली. त्यांनीसुद्धा कर्ज देण्यास काही हरकत नाही असे सांगितले. परंतु हिमायतनगर येथिल बैंक अधिकारी काही जवळीक असलेल्या लोकांना त्यांनी कोणतेही निकष न लावता थेट ८ ते १० लाखापर्यंत कर्ज देऊन टाकले आहे. 

मग मलाच कर्ज देण्यास टाळाटाळ का..? होते आहे. आम्ही सुद्धा बैंकेचे जे नियम आहेत त्याचे पालन करत आहोत. या अगोदर आमच्याकडील सर्व कर्जाची नियमानुसार परतफेड केली. त्यानंतर कर्ज देण्यास का टाळाटाळ चालविली जाते. मला कर्ज दिले नाहीतरी चालेल परंतु अनेक गोरगरीब शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहेत. त्यासर्व शेतकऱ्यांना तरी कृषी कर्ज देऊन दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी करूशी कर्ज वितरण करण्याच्या सूचना बैंक अधिकाऱ्यास द्यावा. अशी विनंती राजेश्वर रायेवार यांनी थेट मुख्यमंत्री, कृषिमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडं लेखी तक्रार देऊन केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी