प्रशासकिय मान्यतेविना सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयाच उद्घाटन
हिमायतनगर| शासनाने अंदाजे दोन कोटी रूपये खर्च करून हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामे दर्जेदार व्हावीत त्याचबरोबर कर्मचारी अधिकाऱ्यांना सोयीचे व्हावे. यासाठी अद्यावत विद्युतीकरण, सोलावर पॅनल, शुध्द व शितल जल, तंत्रशुध्द फर्निचर, परीसर सुशोभीकरण, सुसज्ज देखण्या इमारतीच बांधकाम करण्यात आले. सोबतच वसाहतीच देखिल काम सुरू आहे, इमारतीच सर्व काम होवुन ९ महिण्याचा कालावधी उलटला तरीही इमारतीच उद्घाटन करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, शासकिय गुत्तेदाराला जाग आली नाही. याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर दि.१५ ऑगस्ट रोजी कोणतीही शासकीय परवानगी नसताना परसपर ठेकेदार व अभियंत्याने कोणालाही निमंत्रण न देता स्वतःच्या फायद्यासाठी इमारतीचं उदघाटन करून घेतल्याची जोरदार चर्चा होते आहे.
इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ९ महिने झाले असून, गत महिनाभरा पासुन सुरू असलेल्या अतिवृहस्तीच्या पावसात इमारतीच्या सिलींग मधुन खाली पाणी येत असल्याचे, भिंती ओल्या झाल्याचे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलिही प्रशासकिय आदेश मान्यता नसतांना गाजावाजा न करताच इमारतीच उद्घाचन करण्यात आलं असल्याचे सांगण्यात येत आहे. जर इमारत नियमानुसार झाली असेल तर आत्ताच गुत्तेदार येथिल उपकार्यकारी अभियंत्याला एवढी घाई कस काय? असा प्रश्न विकासप्रेमी नागरीकातून विचारला जात आहे. कार्यालयात उप कार्यकारी अभियंता पद भरलेल आहे, शाखा अभियंता चार पदे मंजुर असुन एक रिक्त आहे. स्थापत्य अभियंता चार पदे मंजुर त्यापैकी एकच कार्यरत आहे.
हिमायतनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे १५ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले उदघाटन प्रशासकीय मान्यता नसताना केले गेले अशी जोरदार चर्चा सुरु असताना आता भारताच्या अमृत महोत्सवी सप्तहाच्या समारोप दिनी संपन्न झालेल्या राष्ट्रगान कार्यक्रमाला येथे नियुक्त असलेले उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांची प्रकर्षाने अनुपस्थित दिसून आली. त्यामुळे या अधिकाऱ्याना देशाच्या राष्ट्रगान कार्यक्रमाचे महत्व वाटले नाही का...? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्व कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी राष्ट्रगान कार्यक्रमास उपस्थित राहून देशाप्रती मानवंदना करत असताना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहून दाखविलेली अनास्था लक्षात घेता संबंधित अभियंत्यांवर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासनाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जाणीवपूर्वक अनुपस्थित असलेल्या अभियंत्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रप्रेमी जनतेतुन केली जात आहे.
वरीष्ठ लिपीक एक मंजुर असुन तोही अतिरीक्त पदावर भोकर येथे आहे, कनिष्ठ लिपीक दोन्ही पदे भरलेली आहेत, सेवक तीन पदे मंजुर आहेत मात्र सर्वच रिक्त आहेत, मजुराची चार पदे रिक्त असुन एकच कार्यरत आहे, असे असतांना याकडे जबाबदार अभियंता लक्ष देत नाहीत, तर मंजुर कामात टक्का कसा उरतो यावरच अधिकच लक्ष असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोकर विभागातील सर्व विश्राम गृहाचे खाजगी कंत्राटदारा कडुन कंत्राटी पध्दतीने कुक, वेटर, सफाईकामगार, वाचमन, जवळपास सहा ते आठ पदे भरल्याचे चर्चिले जाते परंतु येथिल विश्रामगृह २०१५ पासुन बंद असतांनाही पदे भरली कशी?, ती कुठे काम करतात, की शासनाच्या निधीला सुरूंग लावला जातो, असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. याकडे कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कार्यालयाची नवीन वास्तु उभी असुनही जुन्या विश्राम गृहाच्या कार्यालयात उपविभागीय अभियंत्याचे कार्यालय सुरू आहे, त्यामुळे जुने विश्रामगृह बंद आहे, नव्या विश्रामगृहाच्या वास्तुची सर्वांनाच उत्सुकता आहे, असे असतांना महाविकास आघाडीच्या काळात सात महिने आता इमारत तशीच कुलुप बंद असतांना अचानकच कुठलेही प्रशासकिय आदेश नसतांना कार्यालयाच्या इमारतीच मायेच्या मोहापायी उद्घाटन होणार हि बाब कुणाला पचनी पडेल असे दिसत नाही.