उस्माननगर,माणिक भिसे| त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय उस्माननगर विद्यालयामध्ये श्रीकृष्णजन्मदिवस गोकुळअष्टमी सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्रिमूर्ती विद्यालयात विद्यार्थ्यानी उंच शिखर करून दहीहंडी फोडूण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
त्रिमूर्ती शाळेत (गोकूळता) येताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांनी श्रीकृष्ण वं राधाचा पोशाख परिधान करून परिसर गोकूळधाम विद्यालय दिसून आले होते . यावेळी अश्विनी जाधव, पूजा सुक्रे, पूनम शेकापुरे, श्रेया बचेंगावे, शुभांगी शेकापुरे, नम्रता सोनसळे,गायत्री काळम, पूजा राठोड, कोमल राठोड, पायल पंडित राठोड, मयक तांबोळी, माहि तांबोळी, तर कृष्णाचा पोशाख वैभव घोरबांड, याने परिधान केला होता, वं ज्ञानेश्वर घोरबांड, दिपक जाधव, प्रवीण घोरबांड,सद्दामअली फकीर, हसन फकीर, हुसेन फकीर, गणेश घोरबांड,अश्या भरपूर विद्यार्थ्यांनी गोविंदा पथक तयार केले वं दहीहंदीच्या गितावर सुंदर नृत्य करीत मनोऱ्याच्या माध्यमातून दही हंडी फोडली.
या गोविंदा पाथकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून वं अध्यात्मिक गितावरील नृत्य पाहून उपस्थित सर्वजण शाळेच्या विद्यार्थ्याचे कौतुक करीत होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिवडे सर वं श्री जमदाडे सर यांनी केले तर आभार श्री पांडागळे सर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वं कृष्ण राधा मेकप करण्यासाठी सौ. मनीषा अंनमवाड मॅडम वं सौ सविता शेटकार मॅडम यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री श्री शिवसांब कोरे सर,श्री भगवान जाधव सर, पठाण सर, हनुमान मामा, काशिम मामा, शिवहार वारकड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.गोकूळधाम त्रिमूर्ती विद्यालयात दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी इतर शाळेतील विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती.