नांदेड। भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सव प्रसंगी देशभर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम याचे धडे दिले जात असताना त्याचीच प्रचिती आज नांदेड शहरात आपणास अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाने झाली.
नेहरू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या देवांश गोकुल यादव याने आपली मोठी बहीण शताक्षी यादव हीस रक्षाबंधनानिमित्त तिरंगा ध्वज भेट देऊन आपल्या मनात असलेल्या देशाप्रती अभिमानाची ओळख करून दिली. ओवाळणी मध्ये लहान मुलांना कोणी खाऊ देत, कोणी भेटवस्तू देतात, तर कोणी पैसे ओवाळणी मध्ये टाकतात परंतु यादव परिवारातील संस्कार आणि लहान मुलांचे झालेले संगोपन यामुळेच या मुलांमध्ये राष्ट्रध्वज प्रति सन्मान वाढत असल्याचे आपणास या रक्षाबंधन उत्सवात जाणवले. या अनोख्या रक्षाबंधनाची चर्चा आज सर्व समाज माध्यमांवर जोमाने चालू आहे.