देगाव येथे उमेद अभियाना मार्फत महिला आमसभा संपन्न
नायगाव। दिनांक 10 ऑगस्ट रोजी मौजे देगाव ता. नायगाव येथे महिला आमसभा ,वर्धिनी राऊंड चा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आली.
या सभेला उपस्थित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगावचे तालुका व्यवस्थापक श्री इरवंत सुर्यकार, ग्रामपंचायतच्या सदस्या, वर्धिनी टीम, समूह संसाधन व्यक्ती, गावातील महिला स्वयंसहायता समूहातील सदस्य व अपंग समूहातील पुरुष सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुका व्यवस्थापक श्री इरवंत सुर्यकार सर यांनी महिलांना उमेद अभियानची पार्श्वभूमी,उमेद अभियाना मार्फत चालणाऱ्या विविध योजना आठवडी बैठका,दशसूत्री, शाश्वत उपजीविका निर्माण करून महिलांना उद्योजक बनवून त्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेतलं जाणार आहे.
महिलांनी आर्थिक साक्षर त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेत सक्रिय पणे सहभागी व्हायला हवं. महिला ह्या चूलं आणि मुलं एवढ्यावरच सीमित न राहता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सक्रिय पद्धतीने कामकाज करावे असे प्रतिपादन तालुका व्यवस्थापक श्री.इरवंत सुर्यकार यांनी केले....