सर्वांनी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे - धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ५५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार


नांदेड|
उद्यापासून तीन दिवस देशभरात प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. तेव्हा प्रशासनाने घालून दिलेल्या आदर्श ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाच्या वतीने १०० राष्ट्रध्वज मोफत वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी चांदु नरवाडे, भीमराव हाटकर, मुकुंदा   नरवाडे, वंदाबाई विश्वनाथ  हटकर, दैवशाला  गायकवाड, गणपत  नरवाडे, सुभाष नरवाडे, केसरबाई नरवाडे,   मिलिंद नरवाडे, संजय  ईजळीकर,  सुमनबाई नरवाडे,  राहुल केळकर, गौतम शेरे, प्रतिभा  नरवाडे, शेखर  हटकर, संजय नरवाडे, राजु  नरवाडे, वछलाबाई नरवाडे,  मिनाबाई नरवाडे, चंद्रकांत नरवाडे, सत्यपाल सावंत, सुबोध गजभारे, भगवान गायकवाड आदी उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या हर्षोल्लासात विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. उद्यापासून १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १३ रो ५५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमाला भिक्खू संघासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी