नांदेड। एन. टी. सी. मिल परिसरात असलेल्या आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद मुळे आपल्या सर्वांना पक्के घरे मिळवून देण्याची मागणी करत 16.08.2022 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आमरण उपोषणाला समोर बसले होते. आज उपोषणास जिल्हा प्रशासन दखल घेऊन आपल्या मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी RDC साहेब पत्र दिला. आणि दंडाधिकारी यांनी आज रोजी लेखी आश्वासन दिल्यानंतर माझ्या परिसरातील वरिष्ठ मंडळी सोबत चर्चा करून उपोषणास स्थगिती दिला आहे.
आज रोजी या लढात प्रथम यश मिळाली असून, पुढे जर यात प्रशासन हलगर्जी दाखवली तर परत बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. इथे कृती समिती लवकरच आपल्या स्थानिक नागरिक दिलेल्या सर्व वकील पत्र लवकरच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार म्हणून अध्यक्ष श्री. संजय भाऊ वाघमारे यांनी जाहीर केलेत. जिल्हाधिकारी यांच्या पत्रात म्हटले.
जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत श्री हजुर साहिब गुरुद्वारा याना पत्र पाठविले यात आपला परिसराचा जमीनीची प्रश्न मिटवून आपल्या मागणी मार्गी लावण्यासाठी उच्चस्तरीय समिती लवकरच बोलवून मार्ग मोकळा करण्यात यावे. अशी पत्र पाठविले आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका आपल्या गरीबांचा आवाज ऐकविण्यात येईल अशी बोलणी झाली. उपोषण सोडताना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हाध्यक्ष मा. मिलिंद शिरढोणकर साहेब, कृति समिती अध्यक्ष मा. संजय भाऊ वाघमारे, पेन्शन संघटन अध्यक्ष येल्लय्या जी, तेलुगु समाज प्रमुख नेते मा. शिवरात्री सात्यानंद, उप्परपेल्ली बालकिषण,पंजाला सुरेश, समजिक कार्यकर्ता मनोज यादव, उप्परपेल्ली नंदू, कैरमकोडा नर्सिंग, जिंदम अविनाश, महिला शक्ती व इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
भास्कर अण्णा तुम्मा यांनी उपोषण सोडताना अस म्हंटले की, माझ्या परिसरातील जनतेची प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी बसलेला बेमुदत आमरण उपोषणाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य केलेल्या सर्वांना मनपुर्वक त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि हे लढा इथेच तंबविले अस समजुन घेऊ नये माझ्या परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली आहे.