नांदेड| महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व उद्योग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक १५ आगस्ट रोजी स्वातंत्र दिनाचे औचीत्त साधुन ध्वजारोहण तसेच त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ७५ नव उद्योजकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सकाळी ७.३० वाजता अधिशकीय उद्योग आधिकारी नितीन कोळेकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी उद्योग भवन परिसरात वृक्षारोपण केले. ७५ नव उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्याच्या मंचावर अधिशकीय उद्योग आधिकारी नितीन कोळेकर, महावसथापक अमोल इंगळे, व्यवस्थापक अनिल कदम,लघु उद्योग संघटना अध्यक्ष बंगाली, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष शैलेश कर्हाळे, विकास आधिकारी इंगळे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अमोल इंगळे यांनी केले. सहभागी ७५ नव उद्योजकांचा प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प देवुन सन्मान केला. यावेळी उद्योग भवनातील जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, खादी ग्रामोद्योग चे आधिकारी शिवशंकर भोसीकर, एम सी ई डी चे शंकर पवार, कामगार विभागाचे आधिकारी मोशीन खान,अजमल हुसेन सरवरी ,अशोक अंभोरे समवेत ईतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संचलन शंकर पवार व आभार आनिल कदम यांनी मानले