नांदेड| आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने स्वरछंद प्रतिष्ठान गायन विद्यालय सिडको यांच्या वतीने दि. १५ आगस्ट रोजी हडको गोविंद गार्डन मंगल कार्यालयात देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने यावेळी ७५ कलावंतांनी वीररसांची देशभक्ती पर गीते सादर केली.
दि. १५ आगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित देशभक्ती पर कार्यक्रमाला प्रो. पानसकर, डॉ. दुर्गेश रवंदे, प्रभुराज मठपती, दिगंबर शिंदे, क्रष्णा किंगरी, प्रमोद गाडेकर, रवि शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन रितसर उदघाटन केले. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मीकांत रवंदे यांनी केले. यात स्वरछंद प्रतिष्ठान या संस्थेचा मागील २९ वर्षांचा विविध सांगीतीक कार्यक्रमांचा केलेला प्रवास उपस्थित नागरीकांसमोर विषद केला.
सहभागी ७५ कलावंतांनी देशभक्ती पर वीररस गीते सादर करताना श्रोत्यांच्या अंगावर काटा येत देशभावना जाग्रत झाल्या. स्वरछंद प्रतिष्ठान या संस्थेच्या आयोजक समितीचे मुकुंद कुलकर्णी, डॉ. चंदा देशमुख, सुनील क्षिरसागर, बाबुराव शिराळे, धनंजय कंधारकर उमाकांत स्वामी यांनी या सुरेल देशभक्ती पर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संचलन प्रा. लक्ष्मीकांत रवंदे यांनी तर यांनी आभार श्रेया व श्रीनिधी रवंदे यांनी मानले.