अर्धापूर| तालुक्यातील निमगाव येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) परिक्षेत सात विद्यार्थी उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील निमगाव येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्ग ८ वी चे निखिल विजय जाधव (७६%) , कु.वैष्णवी किशन मोळके ६९%,कु.तनुश्री शंकर सोळंके ६७% कु श्रध्दा कानोजी मोळके ६५%, कु वैष्णवी मारोती वाघमारे ६३%, कु श्र्वेता मुंजाजी तेली ६२%, ऋषिकेश माधव कांबळे ५६% हे विद्यार्थी एन. एम. एम. एस. परिक्षेत उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांचा १५ ऑगस्ट रोजी शाळेत पत्रकार दिगंबर मोळके, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापण समिती कडून शालेय साहित्य देऊन पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तद्नंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चना मोळके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष गणपत सोळंके तर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रवीण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच अर्चना संजय मोळके, उपसरपंच अनिता चव्हाण,पोलीस पाटील कानोजी मोळके, तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाराम झुडपे, कृऊबा संचालक कल्याण मोळके, दिगंबर मोळके,अनिल मोळके,देवराव कांबळे, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर कांबळे,बालाजी नरोटे,मनीषा घोरपडे, भीमराव घोंगडे, ग्रामविकास अधिकारी जि. पी.मोळके, बालाजी पोगुलवाड , संजय मोळके, संजय जाधव, वसंतराव चव्हाण, तानाजी कांबळे, राजू सुर्यवंशी, शेख गफार,बालाजी जगताप, केंद्रीय मुख्याध्यापक ग. इ. कांबळे ,मुबीन नदाफ , एल. के. वडजे , ओ. एन. मस्के, एन. बी. कुंडलवार, एस. व्ही.सावते, पी. डी. कुर्तडे , सी.आय.अटकळीकर , चव्हाण व्ही. आर. , व्ही. एन. मुखेडकर , एस. डी. सिरसागर , एस. जी. मठपती , एस.के.रावते , एस. बी. येलनारे आदी उपस्थित होते.