नांदेड| यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई जिल्हा केंद्र नांदेड आणि 'कथायन' यांच्या संयुक्त विद्यमाने जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले होते.निमित्त होते जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे.हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
मराठीतील प्रतिभावंत कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा १० -जुलैपासून आरंभ झाला आहे. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा केंद्र नांदेड आणि 'कथायन' यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जी.ए.धारवाड येथे इंग्रजीचे प्राध्यापक होते.त्यांनी मराठीत विपुल प्रमाणात दर्जेदार कथालेखन केले.अनुवाद केले.त्यांनी लेखकमैत्रांना लिहिलेली पत्रे म्हणजे मराठी पत्रसाहित्याचा अनोखा ठेवा आहे. अशा या प्रतिभावान लेखकाच्या साहित्याला उजाळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या आरंभी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर शिवाजी आंबुलगेकर यांनी जी.एं.च्या 'लग्न' या कथेचे,डॉ.वृषाली किन्हाळकरांनी 'पाणमाया'चे तर डॉ. योगिनी सातारकर पांडे यांनी 'चैत्र' या कथेचे अभिवाचन केले.त्यानंतर दिग्दर्शक क्रांती कानडे यांनी साकारलेला 'चैत्र' हा लघुपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जगन शेळके यांनी आभार मानले.
'कथायन'चे प्रमुख मधुकर धर्मापुरीकर आणि यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेडचे सचिव शिवाजी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास डॉ. माधवराव किन्हाळकर, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. व्यंकटी पावडे,सायली बाराहाते,डॉ. श्रीराम गव्हाणे, विकास जाधव,शिवाजी जोगदंड,जाफर आदमपूरकर,श्रीमती उषा जोशी, सौ. ज्योती धर्मापुरीकर, स्वानंद पांडे,रेणुका चौधरी,श्रीमती सातारकर, प्रा .अनघा जोशी मुधोळकर,डॉ स्मिता मोरे यांची उपस्थिती होती.