हदगाव, शे चांदपाशा| काही तरुण क्षुल्लक कारणावरुन भांडणे करतात एकमेकांचे डोके फोडतात रक्तपात करतात एक विधायक कार्य म्हणून सर्वात श्रेष्ठदान 'रक्तदान ' कराव असे अहवान हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक हनुमंत गायकवाड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तानं पोलिस पोलिस स्टेशन तर्फ शहरातील सुमन गार्डन मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात केले.
या शिबीराला युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोदविला होता रक्तदान शिबीराच्या कार्यक्रच्या प्रारंभी हिगोली लोकसभाचे माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदात्याच आणि ज्यांनी सहकार्य केलं यांचा सत्कार करण्यात आले या प्रसंगी हदगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या गावात तसेच परिसरात पोलिस निरक्षक यांनी गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन रक्तदान सर्वात श्रेष्ठदान असत हे पटवून दिलं परिणाम स्वरुप ५७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सर्व राजकीय नेते एकञ हवे होते..
विशेष म्हणजे या रक्तदानच्या शिबिरात पोलिस स्टेशन द्वरे तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांनासह प्रशासकीय अधिका-याना निमंञित केलं होत विशेष म्हणजे कोणताही राजकीय नेते वेळेवर आले नाहीत परंतु देर आये दुरुस्त आये या म्हणी प्रमाणे एकएक करित सर्व नेते विद्यमान आमदार माजी आमदार लोक नेते आले हे जर सर्व नेते व्यासपिठावर एकञ दिसले असते तर अणखीनच या रक्तदान शिबिराला रंगत आली. असती अशी नागरिकांत चर्चा ऐकवायास मिळाली हे भव्य रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी हदगाव पोलिस स्टेशनचे सपोनी शंकर पाढरे स.पो.निरक्षक संजय गायकवाड, संगिता कदम पोकाँ विश्वनाथ हबर्ड, नागेश गायकवाड आदी व पोलिस कर्मचाऱ्यांनी व पोलिस पाटलांनी परिश्रम घेतले.