नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये राबवला गेला. या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ समिती चे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कार्याध्यक्ष प्र- कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परिसर आणि परिक्षेत्रातील उप परिसर लातूर, परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट व सर्व संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहेत.
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापिठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात विद्यापीठातील सर्व संकुले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजयनगर, नांदेड येथील नवसंजीवनी महिला बचत गट व क्रांतीनगर येथील क्रियाशील महिला बचत गट यांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विपुल प्रमाणात खरेदी केली आहे. सदर उपक्रम अधिकाधिक व्यापक कसा करता येईल यासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयामार्फत या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वराज्य महोत्सव’ च्या निमित्ताने आज दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११:०० वा. विद्यापिठामध्ये कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या स्वागत कक्षात समूह राष्ट्रगीताचे गायन नियोजित वेळेत करण्यात आले.
विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. परमेश्वर हसबे, डॉ. रमाकांत घाडगे. श्री. गोविंद घार, डॉ. अशोक टिपरसे, डॉ. महेश मगर, श्री. गजानन आसोलेकर, डॉ. घनश्याम येळणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ. वसंत भोसले, डॉ. वैजयंता पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, मेजर शांतिनाथ बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व बहुसंख्य कर्मचाऱ्यानी समूह राष्ट्रगिताचे गायन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजी. अरुण धाकडे व विभागाचे कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.