हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे टेम्भूर्णी येथील नागरिकांना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध असताना केवळ रस्ता व टिनशेड अभावी मयताच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर नाल्याच्या कडेला अंत्यसंकर करण्याची वेळ आली आहे. देश एकीकडे भारतच अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना दुरीकडे मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यानंतर आज दि.१७ ऑगस्ट बुधवारी टेम्भूर्णी येथील शिष्टमंडळाने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. मात्र अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हात झटकण्याचा प्रयत्न केल्याने टेम्भूर्णी वासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ या समस्येकडे जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी लक्ष केंद्रित करून टेम्भूर्णीसह तालुक्यातील अनेक गावात रस्ता टिनशेड अभावी मृतदेहाची होत असलेली अवहेलना थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा हागणदारी मुक्तीचा पैटर्न राबविणारे टेंभुर्णी गावचे पुनर्वसन सॅन १९८३ साली झाले. त्यावेळी गावातील मूलभूत सुविधा मध्ये येणाऱ्या स्मशान भूमिकडे जानारा रस्ता व शेडचे काम केले गेले नसल्यामुळे, आजपर्यंत येथील नागराईकन पावसाळ्यात प्रेताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते आहे. रस्ता आणि पावसाळ्यात अत्यविघी करण्यासाठी शेडचि व्यवस्था नसल्यामुळे, गावातील सरपंच व नागरिकांनी 2 की. मी. अंतरावर असलेल्या टेंभुर्णी -दिघी- घरापुर या नाल्यावर म्हणजे जिथे या तीन गावचि शिव असून, टेंभुर्णी शिवारात करण्याचे ठरवले होते.
पन दिघी येथिल नागरिकांनि त्यास विरोध केला. कारन त्या ठीकानि टेंभुर्णी येथील जमिन ही दिघी येथिल दत्त मंदिर मठासी दान दिली आहे. तसेच येणार जाणारा हाच रस्ता आहे अस दिघी येथिल नागरिकांचे म्हणने होते. पन सतत पडत असलेला पाऊस, सगळीकडे चिखल दल दल झाले असल्याने टेंभुर्णी येथील नागरिकांना काहीही पर्याय न्हवता. त्यामुळे सरपंच प्रल्हाद पाटील, पोलिस पाटील यांनी दिघी येथिल नागरिकांना समजून सांगन्याचा प्रयत्न केला. पन ती मंडळी ऐकत न्हवती त्यामुळे सरपंचाने तलाठी, मंडळ अधिकारि, तहसीलदार, यांना या बाबतचि माहीत देण्यासाठी फोन केला. यांनी सुद्धा फोन घेतला नसल्याने अंत्यविधीच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. आखेरिस सरपंच यांनी SDM ब्रिजेश पाटील याना फोन करून या बाबत सविस्तर माहीत दिली. तेंव्हा तहसीलदार महोदयांनी येथील अंत्यविधीच्या समस्येबाबत पोलीस, तलाठी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सूचना दिल्या. तीन तासापासून ताटकळत असलेल्या अंत्यविधीच्या प्रश्न अखेर गावकर्यांनी वाद मिटवून अंत्यविधी कार्यास सुरवात करण्यात आली होती.
या बाबत टेंभुर्णीचे सरपंच प्रल्हाद पाटील यांच्याशि संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षपासून आम्ही येथील स्मशान भूमी रस्ता व शेडची मागणी वारंवार करूनही टेंभुर्णी येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी टेंभुर्णी गावात येऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी याना तत्काळ कारवाई करावी याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर नावायने बदलीवर आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब यांनी सुद्धा टेम्भूर्णी येथील स्मशान भूमी संदर्भात संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेले प्रशासन, लोक प्रतिनिधीचा दबाव, इच्छा शक्तिचा अभाव आणि चिरीमिरी दिल्याशिवाय काम न करण्याची व्रती, यामुळे टेम्भूर्णी येथील स्मशान भूमीचा प्रश्न प्रलंबित आहे.
देश एकीकडे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. दुसरीकडे भारतात विकासाचे धडे देणारे लोक प्रतिनिधी व प्रशासन मूग गिळून बसले आहे. त्यामुळे ग्रामदिन भागातील गावकर्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रशासनाला वशिलेबाजी, चिरीमिरी, द्यावी लागते ही बाब अत्यंत शरमेची आहे. शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात एका आदिवासी माणसावर अंत्य विधी करण्यास सुविधा उपलब्ध नाही. हे या राज्याचे व देशाच्या नागरिकांचे दुर्दैव आहे. ज्या देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहेत आणि पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत. ते असताना याबाबत तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन संवेदनशीलता दाखवीत नाही त्यामुळे आज आम्ही गावकरी हा प्रश्न घेऊन तहसीलदारापुढे आलो आहोत. यापुढे जर येथील टेम्भूर्णी सह तालुक्यातील स्मशान भूमीच्या समस्या सोडविल्या गेल्या नाहीतर पुढचे अंत्यसंस्कार तहसील कार्यालयात प्रेत आणून केले जातील अशी जळजळीत प्रतिक्रिया प्रल्हाद पाटील यांनी दिली.
आता तरी प्रशासन जागे होईल का..?
आज तहसीलदार यांची गावकर्यांनी भेट घेतल्यानंतर सुरुवातीला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन मी निधी देणारा माणूस नाही, माझ्या हातात केवळ जागा देण्याचे आहे... तुम्हाला यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे जावे लागेल असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकरी आक्रमक होताच गावकर्यांनी दिलेल्या निवेदनाची दाखल घेत तात्काळ स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता व शेड बांधून देण्यात यावा या मागणीचा संदर्भ घेऊन गटविकास अधिकारी याना पत्र देत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे. यावर गावकरी समाधानी झाले नसले तरी आतातरी टेम्भूर्णीसह तालुक्यातील ज्या ज्या गावात स्मशान भूमीचा प्रश्न आहे त्या सर्व ठिकाणचे रस्ते व शेडसाठी तेलंगणाच्या धर्तीवर करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.