आजादी का अमृत महोत्सव निमित्त जलधारा येथे शेती शाळा संपन्न -NNL

किनवट तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापुर कृषी मंडळाच्या वतीने जलधारा येथे शेतकऱ्यांना विविध विषयाचे माहिती व मार्गदर्शन                          


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी किनवट तालुका कृषी विभागाच्या इस्लापुर मंडळाच्या वतीने जलधारा येथे राज्य पुरस्कार एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना  सन २०२२-२३ अंतर्गत किनवट तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी जलधारा येथील प्रथम नागरिक सरपंच परसराम सटवाजी मेटकर हे होते.तर मंडळ कृषी अधिकारी ए.एम. यलपलवाड हे प्रमुख मार्गदर्शक होते.कृषी पर्यवेक्षक एस.पी. जाधव, जी.जी.डवरे,आत्माचे शिवकुमार पटवे, कृषी सहायक श्रीनिवास दांडेगावकर,व्ही.ए.पांडे, बी.डी.जाधव ,व्ही.के.पुरी,  जी.एन.गोरे, एस.एम. सुंकलवाड ,श्रीमती वाय.जी.केदार श्रीमती शिल्पा सोनुले, श्रीमती सुनीता  गुडेवार,श्रीमती आर.एस. बुलबुले आदी उपस्थित होते. यावेळी कापूस पिकाबद्दल एस.पी.जाधव यांनी मार्गदर्शन केले सध्या परिस्थितीत पिकांचे कीड व रोग व्यवस्थापन विषयी व पोखरा योजनेअंतर्गत शेती अवजारे बँक व प्रक्रिया उद्योग आणि प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उन्नयन योजना बाबत आत्मा चे शिवकुमार पटवे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत व्ही.ए.पांडे यांनी मार्गदर्शन केले,आभार कृषी सहाय्यक डी. एम. पोगुलवार यांनी मानले यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना सदर योजने अंतर्गत पुरवठा होत असलेल्या औषधींचे वाटप करण्यात आले. पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापना बाबत अतिशय योग्य वेळी मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जलधारा येथील  शेतकरी मित्र प्रकाश शिरडे यांनी व गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमात शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी