एक विलोभनीय तथा ऐतिहासिक क्षण..!!
नांदेड| नांदेडच्या मध्यवर्ती असलेल्या कलामंदिर येथे नांदेड मधील सुज्ञ राष्ट्रप्रेमी ज्येष्ठ महिला पुरूष नागरिकांनी अनपेक्षितरित्या एकच गर्दी केली. कलामंदिर प्रांगणात ठरलेला राष्ट्रभक्तिपर गितांचा बहारदार कार्यक्रम रात्रीचा पाऊस व संभाव्य पावसाचा धोका यामुळे प्रेक्षागृहातच घ्यावा लागला.
नांदेडचे सुप्रसिद्ध गायक कलावंत विजय बंडेवार(नांदेडचे मुकेश), ज्येष्ठ श्रेष्ठ गायक मंजूर हस्मी(नांदेचे रफी), नांदेडच्या गान कोकीळा मेघा गायकवाड, प्रख्यात गायक श्रीरंग चिंतेवार(नांदेडचे किशोर कुमार), प्रसिद्ध गायक जसपाल आदिंनीं अतिशय सुरेल व भारदस्त आवाजात राष्ट्रभक्तीगीतं सादर केरून ज्येष्ठांनां मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास नांदेडचे सुप्रसिद्ध संगीतकार रतन चित्ते, नईम भाई आणि संच यांनी साथ संगत दिली. ज्येष्ठांनी अक्षरशः टाळ्यावर ठेका धरून दाद दिली. कार्यक्रम तब्बल दोन आडिच तास चालला. कार्यक्रमास ज्येष्ठ महिलांची उपस्तिथी लक्षणीय होती.
प्रास्ताविक नांदेड भूषण, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.हंसराज वैद्य (अध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप गुरूवर्य बार्हाळे सर यांनी तर अभार इपीएस95 चे राष्ट्रीय सचिव स.ना. अंबेकर यांनी केले. कार्यक्रमास नांदेडमधील वेग वेगळ्या ज्येष्ठ महिला पुरूष नागरिक संंघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी, ज्येष्ठ नागरिक प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सेवा निवृत बेदाग पोलिस अधिकारी शेख व गणेशराव महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रॅलीचे नेतृत्व नांदेड भूषण, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.हंसराज वैद्य (अध्यक्ष), स.ना.अंबेकर(ईपीएस 95 संघटणेचे राष्ट्रीय सचिव) यांनी केले.
पेन्शनर्स संघटणेचे म.मिरखान, चंद्रकांत जटाळे, सुरेश चौधरी, ईपीएस 95 संघटणेचे बी.आर.बनसोडे, शंकरराव लोकरे, दिगंबर पावडे, विवेक चौधरी, जी मल्या, गणेश मस्के, वसंत सुकळकर, विश्वनाथ शिंदे, शे.नुरोद्दीन, उत्तर मराठवाडा म.म.सं फेस्कॉचे अध्यक्ष अशोक तेरकर, सोमावाड, कोटलवार, कुंटूरकर, सोनुले, तसेच लखमवाड, पेकमवार, डॉ.मट्टमवार, बी.आर. कदम, डॉ.नंदिनी चौधरी, डॉ.शितल भालके, सौ.वैशाली ताई देशमुख, सौ.शाहिन भाभी, सौ.सुमती व्याहाळकर, सौ.सुनिताताई तेरकर, भगिरथी ताई बच्चेवार, डॉ.लक्ष्मी पुरंशेट्टीवार ताई, सौ.साळवे ताई, श्रीमती शततारका पांढरे, सौ.महादेवी मठपती, सौ.लक्ष्मी वाघमारे, लिलावती ताई हिवराळे, तपस्विनी, रेणूका, श्रीमती अनुराधाताई गिराम आदि रॅलित उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या तिरंगा रॅलितील सहभागी नागरिकांना प्रत्येकी एक तिरंगा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेशरावजी महाजन (राष्ट्रीय उपाध्यक्ष, आर्य वैश्यसमाज) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रॅलिस सौ.निर्मलाताई बार्हाळे व श्री.बार्हाळे यांच्या हस्ते मार्गस्त करण्यात आले. रॅली कलामंदिर, वजिराबाद चौक, मारवाडी धर्मशाळा, तरोडेकर मार्केट मार्गे मार्गक्रमन करत असतांना नांदेडकर दुतर्फा टाळ्यांनी स्वागत करत होते. महाजन शोरूम समोर येताच रॅलीरवर गुलाब पुष्प वर्षाव करण्यात आला. हे दृश्य अत्यंत विलोभनिय तथा ऐतिहासिक असे होते. रस्त्याच्या दुतर्फा नांदेडकर रॅलीचे छायाचित्र व चलचित्र काढत होती. रॅली महाविर स्तंभाला वळसा घालून महात्मा गांधीजींच्या पुतळ्या समोर आली. तिथे पुनःच्य एकदा डॉ.हंसराज यांनी रॅलीतील सर्व ज्येष्ठ महिला पुरूषांचे, नांदेडकर जनतेचे व विशेष करून वजिराबाद पोलिस निरिक्षक व रॅलीच्या बंदोबस्तात तैनात पोलिस ऑफिसर्सचे अभार मानले.