इस्लापूर। देश्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाचा खासदार भावनाताई गवळी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकाने खोडसाळ पणाणे त्या पोस्ट वर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून दोषींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
इस्लापूर पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राखी हा बहिण, भावाचा राष्ट्रीय सन या निमित्ताने वाशिम च्या खासदार भावनाताई गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राखी बाधली. या स्वरूपाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच एका व्यक्तीने त्या फोटोवर आता ईडीची काय मजाल कारवाई करायला, असा खोडसाळ पणे आक्षेपार्ह मजकूर लिहून बहिण, भावाच्या नात्याचा अपमान केला असून भावना दुखावण्याचा प्रकार आहे. तेव्हा सदर दोषी इसमावर कायद्याचा बडगा उगारावा. अशी मागणी संदीप संभाजी पाटील, शेख लतीफ, काशिनाथ शिंदे,विकास मारोती माहूरकर यांनी केली आहे.