शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट माहूर तालुक्यात जुलै महिन्यामध्ये झालेल्या अद्भुतपूर्व अतिवृष्टीमुळे किनवट माहुर तालुकासह तालुक्यातील इस्लापुर, जलधारा, शिवणी, अप्पारावपेठ या भागातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.
सरकार ने किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा अशा प्रकारची मागणी विविध राजकीय,सामाजिक संघटना व शेतकऱ्यांकडून लेखी निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा मागणी करण्यात आलेली नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.७ व ८ आगस्ट असे दोन दिवस मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी दौरा आहे,असे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले असून या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी किनवट माहूर तालुक्याचा ही दौरा करून नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.
मागील जुलै महिण्यात नांदेड जिल्यात झालेल्या पावसाची जिल्ह्यातील इतर तालुक्या पेक्षा किनवट माहूर तालुक्याची नोंद मोठ्या प्रमाणात आहे.याची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी किनवट माहूर तालुक्याचा दौरा करून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये हेक्टरी देण्याची मागणी इस्लापूर जलधारा शिवनी सह किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधव करीत आहेत. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉ.विपीन ईटणकर यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी इस्लापूर, जलधारा, शिवणी अप्पारावपेठ, किनवट माहूर तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान पाहणी केली यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी व सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपयाची मदत द्यावी असे लेखी निवेदन देऊन मागणी केले होते.
किनवट माहूर तालुक्यात खरीप हंगामच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे लपंडाव झाले होते.या मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागले होते,त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या अद्भुतपूर्व अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांची उभी असलेली पिके वाहून गेल्या. यात सोयाबीन, कापूस, मूग,उडीद केळी,हळद,मक्का या पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत किनवट माहूर तालुक्यातील ९९४ मि.मी पेक्षा ही जास्त पावसाची नोंद झाली आहे,या तारखेपर्यंत सामान्यतः दरवर्षी ४०० मि.मी.सरासरी पाऊस असतो शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान असताना सुद्धा महसूल विभागाने प्रादेशिक स्तरावर मोजक्या ठिकाणचे पंचनामे केली आहेत.त्यामुळे उद्याला शासनाकडून मदत मिळतांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यापासून वंचित राहण्याची मोठी शक्यता आहे.करिता नांदेड जिल्याच्या विविध तालुक्यात ही अद्भुतपूर्व अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे कळत आहे.
करिता मराठवाड्यातील नांदेड जिल्याचे शेवटच्या टोकावर असलेले तेलंगणाच्या सीमेवरील किनवट माहूर तालुक्यात विशेष दौरा करून साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ मानले जाणारे माहूर येथील आई रेणुकामाते चरणी नतमस्तक होऊन हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था जाणून घ्यावी आणि शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत तात्काळ करावी असे किनवट माहूर तालुक्यासह तालुक्यातील इस्लापूर जलधारा शिवणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.या साठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी किनवट माहूर तालुकासह तालुक्यातील इस्लापुर जलधारा शिवणी भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.