सालाना बरसी उत्सव सोहळा थाटामाटात
नांदेड। गुरुद्वारा लंगर साहिब येथील संत महापुरुषांनी भाविकांची सेवा करण्यासाठी भक्ति आणि सेवेचा समन्वय राखला. संतबाबा निधानसिंघजी, संतबाबा हरनामसिंघजी, संतबाबा आत्मासिंघजी मोनी आणि संत बाबा शिशासिंघजी यांनी सेवेचा एक संसार उभे केला. त्या सेवेची परंपरा संत बाबा नरिंदरसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले हे सक्षमपणे सांभाळत आहेत. असे प्रतिपादन तखत सचखंड येथील मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी सालाना बरसी कार्यक्रमात केले.
यावेळी कार्यक्रमात मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघ, सहायक जत्थेदार संत बाबा रामसिंघ, हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघ, मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघ, संत बाबा नरिंदरसिंघकारसेवा वाले, संत बाबा बलविंदरसिंघ कारसेवा वाले, संत बाबा अवतारसिंघज दल बाबा बिधीचन्द, संत बाबा गुरदेवसिंघ शहीदीबाग आनंदपुर साहिब, संत बाबा तेजासिंघ गुरुद्वारा माता साहेब वाले. नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगा सिंघ कर्नालवाले, संत बाबा जित सिंघ जोहाला, संत बाबा महेंद्रसिंघ अयोध्या, संत बाबा रवींद्रसिंघ नानकसरवाले, बुड्डा दल वाले संत बाबा जसासिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तथा माजी पोलीस महासंचालक डॉ परविंदरसिंघ पसरीचा यांची प्रमुख उपस्थिती होती. संत मंडळीच्या पावन उपस्थितीत संतबाबा निधानसिंघजी यांची 75 वीं बरसी तर संत बाबा हरनामसिंघजी यांची 43 वीं, संत बाबा आत्मासिंघजी मोनी यांची 39 वीं आणि संत बाबा शिशासिंघजी कारसेवा वाले यांची 17 वीं बरसी सामूहिक रित्या साजरी करण्यात आली.
संत बाबा कुलवंत सिंघ आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, दरवर्षी गुरुद्वारा लंगर साहेब मध्ये सालाना बरसी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचा जागर होतो. कार्यक्रमात हजारों भाविकांच्या उपस्थिती मुळे ह्या कार्यक्रमाचा धार्मिक संदेश जगभर पोहचतो. संतांनी दिलेल्या योगदानाची या निमित्त माहिती होते. यावेळी संत बाबा अवतारसिंघजी, संतबाबा निर्मलसिंघ यानी ही आपल्या भाषणात सालाना बरसीचे धार्मिक महत्व केले. तर संत बाबा नरिंदरसिंघ यांनी आपल्या मनोगतात संतांनी सुरु केलेल्या कार्याचा वसा सेवाभावाने पुढे घेऊन जाऊ. त्यांनी देशाच्या विविध भागातून आलेल्या संत आणि भाविकांचे आभार मानले.
सालाना बरसी निमित्त आज दिवसभर लंगर प्रसाद कार्यक्रम सुरु होते. नांदेडच्या स्थानीक भाविकांनी ही कार्यक्रमात उपस्थित होऊन बरसी कार्यक्रमाचा लाभ घेतला. देश विदेशातुन मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते, नगीना घाट परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.