७५ वर्षाच्या काळात भारत देश प्रगतीच्या उंच शिखरावर पोचला - आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

तहसील व पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन


हिमायतनगर, अनिल मादसवार| भारताला स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्ष पूर्ण झाले, त्याबाबद्दल भारतीय स्वातंत्र्याचा मारुती महोत्सव साजरा केला जात आहे. या आनंदाचं क्षणी भारत देशातील सर्व नागरिकासॊबत आपण सर्वजण हा सोहळा अनुभवत आहोत. ७५ वर्षाच्या काळात भारत देश प्रगतीच्या  उंच शिखरावर पोचला आहे, याचे सर्व श्रेय माझ्या सर्व भारतीयांचं आहे. या अविस्मरणीय सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित झालेल्या व माझ्या मतदार संघातील सर्व मायबाप जनतेला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो असे म्हणत आ.जवळगावकर यांनी तहसील व पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले असे जाहीर केले.   


हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या मैदानात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील आणि पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची फेरी, महोत्सवी वर्षाचा अंक तयार करून विद्यार्थ्यांनी भारताच्या तिरंग्याचे दृश्य साकारले, तसेच आपल्या अंगी असलेल्या विविध कला गुण सादर करण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर १० वाजता या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन हादगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी २ चिमुकल्या विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देऊन सन्मानित करत आ.जवळगावकर, तहसीलदार अवधाने, गटविकास अधिकारी आंदेलवार, गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे, पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनर, कृउबाचे सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात शहरातील चार शाळांनी सहभागी होऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताच्या तालावर आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून शाबासकी मिळविली. 


या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण ड्रोन कैमेऱ्याद्वारे करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अविस्मरणीय दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी आमदार जवळगावकर यांनी सर्व चिमूल्य विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक व शहर परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी पत्रकार, सर्व पक्षीय कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते. 


त्याच्यापूर्वी हिमायतनगर तहसील व पंचायत समितीच्या वतीने आपापल्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर येथूल सेल्फी पॉईंटच्या उदघाटन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. यावेळी सर्वानी भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षाच्या हर घर तिरंगा या सेल्फी पॉइंटवर तिरंगा ध्वज हाती धरून फोटो काढून घेत या उपक्रमात सहभाग नोंदविला.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी