जालना/नांदेड| दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी रावसाहेब पाटील दानवे, माननीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा आणि खाण यांच्या शुभ हस्ते जालना रेल्वे स्थानकावर 100 फूट उंच स्मारकीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आले.
यावेळी नारायण कुचे, माननीय आमदार, बदनापूर आणि अर्जुन खोतकर, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. शरत चंद्रायन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड तथा हैदराबाद विभाग, के नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, जय पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.
राष्ट्रवादाची भावना पुन्हा जागृत करण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी रेल्वे स्थानकावर भव्य तिरंगा फडकावण्यात आला. हा स्मारकीय राष्टीय ध्वज 100 फूट उंच आहे आणि या राष्ट ध्वजाचा आकार 30 x 20 फूट आहे आणि तो मोटरवर चालतो.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, तिरंगा ध्वज हा अभिमानाचे प्रतीक आहे जो जात, पात, धर्माचा विचार न करता प्रत्येक भारतीयाला एकत्र आणतो. ते म्हणाले की, ‘हर घर तिरंगा’ हा भारत सरकारचा स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देणारा आणि सर्वांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा उदात्त उपक्रम आहे. माननीय राज्यमंत्री म्हणाले की, पूर्वी राष्ट्रध्वज फक्त काही ठिकाणी फडकावला जायचा, मात्र, माननीय पंतप्रधानांच्या पुढाकाराने प्रत्येक घराने राष्ट्र उभारणीच्या बांधिलकीचे मूर्त स्वरूप म्हणून राष्ट्रध्वज लावला आहे.