मजूर -कामगार व सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी चौथा आधारस्तंभ मैदानात उतरला - विनायक कामठेकर -NNL


नांदेड।
सुरक्षित हयगय करून बांधकाम मजुराचे मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या जीव्हीसी कंपनीचे संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करावेत यासह मजूर-कामगार व सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध मागण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मागील चार दिवसापासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण धरणे आंदोलन करीत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 पासून दैनिक माहितीचे संपादक विनायक कामठेकर हे आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपवर मोफत हवा, पाणी, स्वच्छतागृह व रेस्टरूमची व्यवस्था करावी, सुरक्षेच्या उपायोजना न करता मजुरांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या मनपा घनकचरा व्यवस्थापन एजन्सी आर ऍड बी वर कारवाई करावी, सुरक्षित हयगय करून बांधकाम मजुराचे मृत्यूस कारणीभूत जीवीसी कंपनीचे गंगाप्रसाद तोष्णीवाल व भागीदारांवर गुन्हे दाखल करावेत, भेसळयुक्त खाद्य तेल विक्री बंद करा, ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित करून अवैध प्रवासी वाहतूक थाबे बंद करा, गुंठेवारीच्या प्रलंबित संचिकातील भ्रष्टाचार बंद करावा व शहर व जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहेत.

मागील चार दिवसापासून आंदोलन सुरू असून देखील विविध मागण्या संदर्भात प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई केली जात नसल्याने यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विनायक कामठेकर यांनी दिला आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी