उस्माननगर| उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या समता मा.व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेच्या इ.स.१९९८ मधील विद्यार्थ्यांचा. शनिवार ६ ऑगस्ट रोजी स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मा.मुख्याध्यापक व उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले मा.श्री.श्यामसुंदरराव जहागिरदार गुरुजी हे राहाणार आहेत.तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.श्री.बा.दे.कुलकर्णी ( मा.मुख्याध्यापक समता विद्यालय ) मा.श्री तु.शं. वारकड गुरूजी ,मा.श्री .विश्वाभंर पल्लेवाड ,मा.श्री. शेख खय्युम, हे राहणार आहेत.
दि.६ ऑगस्ट रोज शनिवारी सकाळी समता विद्यालयाच्या प्रांगणात १९९८ मधील बॅच मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्हाॅटस्प ग्रुपमध्ये चर्चा करून सर्वजन एक दिवस एकत्र येऊन स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे ठरले.लहानपनी एकत्र असलेले मित्र आपआपल्या गरजेनुसार दुरदूर विखरले ,कामधंद्यामध्ये बंदीस्त झाले.एकदिवस एकत्र येऊन स्नेहसंमेलन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी हे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन स्नेहसंमेलन आयोजित केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली आहे.समता विद्यालयातील संस्थेचे संचालक मंडळ,आजी माजी विद्यार्थी व पत्रकार मंडळी हे उपस्थित राहणार असून शाळेवर प्रेम करणाऱ्या शिक्षणप्रेमीनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.