उस्माननगर। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला भारतासह जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा,व उस्माननगर परिसरातील पंचक्रोशीतल्या घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे यावे असे आवाहन उस्माननगर वीभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष पत्रकार गणेश लोखंडे यांनी केले.
घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामसेविका शिंदे- माने यांनी केले होते.उपसरपंच बाशीदभाई शेख , यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक.पत्रकार , महसूलचे अधिकारी, जि.प.शाळेचे शिक्षक , या बैठकीस उपस्थित होते. दारिद्रय रेषेखालील कुटूंबांनाही तिरंगा लावता यावा यासाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तदायित्वाच्या माध्यमातून तिरंगा देण्यासाठी पुढे सरसावे, असेही आवाहनही त्यांनी केले.