नांदेड| कुंभार समाजातील प्रतिष्ठीत तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील व्यक्तीमत्व आणि पंचायत समिती बिलोली द्वारा गुरूगौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक गंगाधरराव नारायणराव देगांवकर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी दि.१९ ऑगस्ट ऱ्हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांचा निधनाने कुंभार समाजातील एक सदगुणी तथा समाजशील व्यक्तीमत्वाचा अंत झाला. दि .20 ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ठीक २ :00 वाजता देगांव ता . नायगांव जि. नांदेड येथे अंत्यविधी होणार आहे. स्वर्गीय देगांवकर यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, भाऊ, भावजय तसेच नातवंडे असा परिवार आहे .