हदगाव, शे चादपाशा| हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील राजेश ज्ञानेश्वर चव्हाण वय अठरा बाळापूर येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या शुक्रवारी कयाधू नदीकडे असलेल्या शेतातील जनावरांना चारा पाण्यासाठी गेला होता. जनावरांना पाणी पाजताना पाण्यात तोल गेल्याने नदीपात्रात बुडुन मुत्यु झाला असल्याची घटना घडली.
हदगाव तालुक्यातील मोजे उंचडा येथील राजेश ज्ञानेश्वर चव्हाण दिनांक 19 रोजी आपल्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठया आपल्या शेताकडे गेला होता नियतीने घात केल्याने तोल जाऊन नदीपात्रात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकारी जमादार गिरी व कॉन्स्टेबल आनंद वाघमारे, यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवुन पुढील तपास मनाठा पोलीस करीत आहे.