उस्माननगर, माणिक भिसे| येथील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा आजादी का अमृत महोत्सव दिन वरुणराजाच्या साक्षीने ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलिस स्टेशनमध्ये सकाळी पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स.पो.उपनिरीक्षक पल्लेवाड व त्यांचे सहकारी कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक देवरावजी सोनसळे,सा. काजी , शिवशंकर काळे,नरेश शिंदे,अदी उपस्थित होते. सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका शिंदे-माने, उपसरपंच बाशीद शेख, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, पोलिस पाटील मोरे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित होते.यावेळी माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे संस्थेचे संचालक देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे, भगवान राक्षसमारे, देविदास डांगे,मन्मत केसे , नितीन लाटकर, शखील शेख , श्रीमती मणीषा सोनसळे, यांच्यासह शिक्षिका कर्मचारी व पोलीस निरीक्षक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते.विद्यार्थ्यानी गावातील प्रमुख मार्गाने लेझीम बॅन्डच्या निनादात व प्रभातफेरी काढण्यात आली.जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि.प.प्रा. कन्या शाळेत मुख्याध्यापिका श्रीमती वांगेबाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्रिमूर्ती मा. विद्यालय शाळेत माजी पं.स.सदस्य व्यंकटराव घोरबांड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवसांब कोरे , यांच्यासह शिक्षक शिक्षिका कर्मचारी नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह येथे माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी वसतिगृहातील लक्ष्मण कांबळे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक देवरावजी सोनसळे, व्यंकटराव घोरबांड, शिवशंकर काळे, पत्रकार मित्र,नागरिक , विद्यार्थी उपस्थित होते.पोस्ट ऑफिस येथे पोस्टमास्तर श्री बुक्तारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोस्टातील सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.प्रा.आरोग्य दवाखान्यात डॉ.नंदगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी दवाखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सेवा सहकारी सोसायटी, झैडा चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले . महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे सकाळी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यपकवृंद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.सेवा स.सो.येथे ध्वजारौहण करण्यात आले. शारदा वाचनालयात संचालक शा.शं जहागीरदार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल सुर्यकांत मालीपाटील,ना.दी.पांचाळसह अनेकजण हजर होते.स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गावातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात झेंडा वंदनसाठी पोलिस पाटील मोरे, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे, शिवशंकर काळे, गोविंद पोटजळे, माने, अंगुलिकुमार सोनसळे,कचरु घोरबांड , यांच्यासह लोकप्रतिनिधी, पत्रकार, शेतकरी,व्यापारी उपस्थित होते. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद कर्मचारी यांच्या संकल्पनेतून देशभक्तीपर गीतातून कन्या शाळेत सादरीकरण करण्यात आले.सुंदर अशा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. देशभकत्तीच्या जय घोषणांनी परिसर देशभक्तमय झाला होता.