नांदेड| मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय चळवळींमध्ये काम करणारे शेकापचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नांदेड शहर कक्ष प्रमुख पदी निवड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी केली आहे.
तत्पूर्वी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधीकारी तथा माजी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची भेट घेऊन नांदेड परीसरातील रुग्णांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,महात्मा फुले जण आरोग्य योजना,धर्मदाय रूग्णालयात 10 टक्के वाटा मिळवुन देण्याची तसेच पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट तसेच डाॅ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन ची मदत मिळवुन देन्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करन्याची ग्वाही कामेवार यांनी दिली. समाजकार्यात सदैव अग्रेसर असणार्या सुभाशिष कामेवार यांची निवड केल्या मुळे नांदेड मधील गरजु रुग्णांना याचा लाभ मिळेल.