उस्माननगर, माणिक भिसे| येथील शिस्तप्रिय सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्री.विश्वासराव लोखंडे गुरुजी यांचा १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जि.प.प्राथमिक कन्या शाळेच्या वतीने वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात लोखंडे गुरुजी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
उस्माननगर येथील शिस्तप्रिय सेवानिवृत्त आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे गुरुजी यांच्या वाढदिवशी शाळेच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लोखंडे गुरुजी याना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.ते म्हणाले की,माझी पहिली पोस्टींग १३/ ७/१९६५ ला प्रथम नेमणूक याच शाळेत झाली.
आणि ३१ / ७/२००० मध्ये सेवानिवृत्त देखील याच शाळेत झालो अन् माझा वाढदिवस देखील याच शाळेत होत असल्याने मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.त्या काळातील आठवणी शिक्षकांना सांगून शिदोरी डोळ्यासमोर दाखवली आहे.यावेळी संकुलाचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक जयवंतराव काळे, एकनाथ केंद्रे,शेख , सौ.सुनंदा पुठ्ठेवाड, सौ.आल्लेवाड मॅडम , तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण काळम, गणेश लोखंडे,श्रीमती वांगेबाई,सौ.मंजुषा सिरसाळकर , अनिरुध्द सिरसाळकर , सोनकांबळे, सौ.अशाबाई डांगे ,अदी शिक्षक शिक्षिका , कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.