नविन नांदेड। ग्रामपंचायत कार्यालय तुप्पा येथे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुप्पा ग्रामस्थांचा वतीने पोलीस पाटील अझोमोधदीन व मुख्याधिपीका पंडकंठवार यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
१५ आगष्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण झाल्या नंतर तुप्पा गावात २५ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झालेले पोलिस पाटील शेख अझमोधदीन शेख हसनसाब व जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक माया शंकर पंडकंठवार या ३२ वर्ष सेवा करून ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
संरपच सौ. मंदाकिनी ज्ञानेशवर यन्नावार , ऊपसंरपच पार्वती बाई बालाजी कदम, ग्रामसेवक कावळे,कृषी सहाय्यक कासटेवाड,सेवा सोसायटी चेअरमन गोविंदराव चितळे, व्हाईस चेअरमन रामराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कदम, पंचायत समिती सदस्य गंगाधर नरवाडे, माजी संरपच शिवकांत कदम, शेख चांद पाशा,बबन कदम, चिमणाजी पाटील,महाजन कदम, बापुराव पवार, व्यंकटराव चितळे,दता पाटील व जिल्हा परिषद शाळा येथील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ,जेष्ठ नागरिक,युवक महिला,व जय शिवराय मित्र मंडळाचे पदाधिकारी , नविन नांदेड भागातील पत्रकार बांधव, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी,बचत गट महिला पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.सुत्रसंचलन रवि पंडित यांनी केले. यावेळी पोलीस पाटील अझोमोधदीन व मुख्याधिपीका पंडकंठवार यांच्या ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.