नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी मगनपुरा भागातील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या मालपाणी विद्यालयात द्वारकादासजी साबू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त गेल्या सप्ताहात शाळेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. ध्वजारोहण द्वारकादास साबू, स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिह व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सुरेश दागाडीया, दिवाकर शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी देशात इस्ट इंडिया कंपनीचे आगमन यानंतरची गुलामी त्यातून उभारलेली स्वातंत्र्याची चळवळ, जालियानवाला बाग हत्याकांड, भगतसिह, सुखदेव, राजगुरु, लाला लजपतराय व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशासाठीचे बलिदान यावर विचार व्यक्त केले. ब्रिटीशांची जातीधर्मात तेढ निर्माण करत फुटीच्या नीतीतून बंगालची फाळणी झाली याचा धडा घेण्याची गरज आहे. देश एकसंघ व सलोख्याने राहण्यासाठी सर्व धर्म समभाव हेच विचार आवश्यक असून सर्व देशवासीयांच्या सांघिक प्रयत्नातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, जयप्रकाश काबरा, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, डॉ. अरुण तोष्णीवाल, बद्रीनारायण मंत्री, अॅड प्रवीण अग्रवाल, शाळेतील आजी-माजी विद्यार्थी, पालक व शाळेतील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांना नाष्टा व खाऊ ची व्यवस्था बालमुकुंद कालाणी, श्याम कालाणी, विजय कासट, एस. तोटेवाड यांनी केली.