५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
नविन नांदेड। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संतोष हंबर्डे यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी नांदेड युवासेनेचे तालुकाध्यक्ष संतोष हंबर्डे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, सध्याला चालू असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता विशेषत: तरुण पिढीने समोर येऊन रक्तदान करावे,रक्तदान करून रक्ताचे नाते निर्माण करू अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष संतोष हंबर्डे यांनी दिली.
या रक्तदान शिबिरास युवासेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड ,नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे , नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे,जिल्हा समन्वयक नवनाथ बापू चव्हाण, शहर प्रमुख आनंद घोगरे, तालुका समन्वयक दामाजी पाटील ठाणेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवासेनाचे नांदेड दक्षिणचे तालुका चिटणीस प्रवीण हंबर्डे ,ग्रा.पं.सदस्य सचिन देशमुख, राजेश हंबर्डे , शाखाप्रमुख अशोक हंबर्डे ,सचिन हंबर्डे, प्रदीप कांबळे राज हंबर्डे , कृष्णा डुकरे ,कैफ सिद्दिकी, अश्वमेधं हंबर्डे आदीनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबीर मध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.